अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय उर्फ मेमो आणि पीडित युवती 2015 पासून रिलेशनशिपमध्ये होते. 2015मध्ये मेमोने पीडित तरुणीला घरी बोलवले. मेमोनं सॉफ्ट ड्रिंगमधून नेशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

मुंबई : अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात ओशिवारा पोलिसात बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्ती गर्भ पडल्याचा आरोप एक पीडित युवतीने करत तक्रार दाखल केली आहे.

जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणारे युवक ताब्यात

पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय उर्फ मेमो आणि पीडित युवती 2015 पासून रिलेशनशिपमध्ये होते. 2015मध्ये मेमोने पीडित तरुणीला घरी बोलवले. मेमोनं सॉफ्ट ड्रिंगमधून नेशेच्या गोळ्या देऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. शिवाय, लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली. वारंवार मेमोने या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले त्यातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तो आणि त्याच्या आईकडून गर्भ पाडण्यासाठी धमकवण्यात आल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.

सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार: अनिल देशमुख

दरम्यान, पीडित युवतीने मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाला गर्भ पाडण्यास साफ नकार दिला. त्याचवेळी मेमोने काही गोळ्या खायला दिल्या आणि जबरदस्तीने गर्भ पाडल्याचा आरोपही केला आहे. केवळ लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, प्रत्यक्षात विषय काढला तर टाळाटाळ होत असल्याने युवतीने त्याच्याविरोधात बलात्कारासह फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीने शान वाढलीः गृहमंत्री

पीडित युवतीने दिल्लीतील न्यायालयात या प्रकरणी न्याय मागण्यासाठी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाकडून प्राथमिक पुराव्यांच्या आधारे गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येणार आहे.

Title: mithun chakraborty son mahaakshay chakraborty filed case
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे