धाडसी पोलिसाने ऑपरेशन थिएटरमध्ये 'असे' पकडले नागाला...

नंदुरबार : नंदुरबार मधील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मध्यराञीच्या सुमारास अॉपरेशन थिएटर मध्ये नागाने प्रवेश केला अन सर्वांचीच भंबेरी उडाली.परंतु पोलीस दलाच्या धाडसी पठ्ठयाने अतिविषारी नागाला पकडले अन सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

काही घटना या अंगाचा थरकाप उडविणा-या असतात.अतिदुर्गम भागात त्याचा सातत्याने अनुभव येत असतो.असाच एक प्रसंग घडलाय तो नंदुरबार मध्ये. नंदुरबार जिल्हयात सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक महिला राञीच्या सुमारास प्रसुती शस्यक्रियेसाठी आलेली होती.याच वेळी शस्ञक्रिया विभागाच्या खोलीत अतिविषारी साप असल्याचे काहींना निदर्शनास आले.यावेळी अनेकांना दरदरुन घामही फुटला.

याचवेळेस ही घटना नंदुरबार पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल विशाल नागरे यांना समजली.त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दवाखाना गाठला.अन मोठ्या धाडसाने मोठा फना काढणा-या विषारी नागाला बाटलीबंद केले.यावेळी अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.यानंतर दवाखान्यात शस्ञक्रिया साठी आलेल्या महिलेची सुखरुप शस्ञक्रियाही पार पडली.नंदुरबार पोलीस दलातील बहादुर पठ्ठयाचे मध्यराञी दोन वाजता दाखविलेल्या तत्परतेचे नक्कीच कौतुक करायला हवे.

Title: midnight eneter cobra in hospital but cops captured
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे