मॅट्रिमोनीवरून महिलांची फसवणूक करणारा भामटा अटकेत

अहमदनगर : सोशल साईट्सचा गैरवापर करुन फसवणुक करण्याचे प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असतानाच अहमदनगर जिल्हयात फसवणुकिचा नवा प्रकार उघडकिस आला असुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अहमदनगर : सोशल साईट्सचा गैरवापर करुन फसवणुक करण्याचे प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत  असतानाच अहमदनगर जिल्हयात फसवणुकिचा नवा प्रकार उघडकिस आला असुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, आरोपी याने जीवनसाथी डॉट कॉम यावरुन फिर्यादीशी संपर्क करून फसवणुकीने लग्न केले. तसेच ईमेलवरुन धमकी देणारे मेल पाठविले.

आरोपीने फिर्यादी सह अनेक मुलींना जीवनसाथी डॉट कॉम यावरुन कॉन्टॅक्ट करुन त्यांचेशी रिलेशिनशिपमध्ये राहुन त्यांना देखील फसविले आहे.या फिर्यादीवरून त्याचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.नमुद आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. आरोपी हा इंजिनिअर असल्या कारणाने त्याला शोधण्यास अडथळे निर्माण होत होते.अथक प्रयत्नानंतर आरोपी हा बँगलोर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तात्काळ सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी बँगलोर मधून पोलीसांच्या मदतीने आरोपीस सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले आहे.

 

Title: Man arrested for cheating on matrimony
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे