राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यास मुदतवाढ!

राज्य सरकारने गुरुवारी (ता.15) काढलेल्या आदेशान्वये पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्यांना पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

मुंबई: राज्य पोलिस दलातील अधिकारी तसेच कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यासाठी शासनाने 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु, शासनाने ती मुदत वाढवली आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या 30 ऑक्टोबर पर्यंत कराव्यात असे सांगितलं आहे.

राज्यातील वरिष्ठ आयपीएससह पोलिस अधिका-यांच्या बदल्या

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे नेहमीप्रमाणे होणार्‍या पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या प्रलंबित आहेत. राज्य सरकारने गुरुवारी (ता.15) काढलेल्या आदेशान्वये पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदल्यांना पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. शासनाने यापुर्वी 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना मुदत दिली होती. त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, आता पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या 30 ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार आहेत.

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा बदल्यांचे ठिकाण

दरम्यान, बदल्यास विलंब होत असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

Title: maharashtra police pi psi police employee transfer extension
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे