महाराष्ट्र पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीला सलाम!

तिसरी घंटा वाजवणे आपल्या हातात आहे!

मुंबई: राज्यात गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाउन जाहीर करण्यात आला. नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस अहोरात्र मेहनत घेताना दिसत असून, हटके पद्धतीने समाज प्रबोधन करत आहेत. नेटिझन्सनी महाराष्ट्र पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीला सलाम ठोकला आहे.

अनलॉकच्या माध्यमातून काही गोष्टींना सरकारने परवानगी दिली असली तरीही वाढती रुग्णसंख्या पाहता, पुन्हा सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात पोलिस यंत्रणांवर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर अंकुश ठेवण्याचे काम आहे. या काळात अनेक माध्यमांतून महाराष्ट्र पोलिस जनतेला घरात राहून सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याबद्दल जनजागृती करत आहेत.

महाराष्ट्र पोलिस सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कोरोनाविषयीची माहिती क्रिएटीव्ह पद्धतीने देत असतात. तर यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी मराठी नाटकांच्या नावाचा वापर करुन ट्विटर हँडलवर लॉकडाउनचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन जनतेला केले आहे. आपल्या आवडत्या नाटकात कलाकारांना त्याच भूमिकेत पुन्हा एकदा बघण्यासाठी आधी आपल्याला जबाबदार नागरिकाची भूमिका निभवावी लागेल, असे म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी जनतेला लॉकडाउनचे नियम पाळत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Title: maharashtra police creativity for corona virus lockdown
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे