पोलिसाचा अर्ज सोशल मीडियावर झाला व्हायरल...

एका पोलिस कर्मचाऱयाने सुटीसाठी अर्ज केला आहे. अर्जातील कारण गमतीशीर असल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कारण, सुटीचे कारण आहे, घरच्या म्हशीची सेवा करण्यासाठी.

भोपाळ (मध्य प्रदेश): एका पोलिस कर्मचाऱयाने सुटीसाठी अर्ज केला आहे. अर्जातील कारण गमतीशीर असल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कारण, सुटीचे कारण आहे, घरच्या म्हशीची सेवा करण्यासाठी.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात तैनात असलेल्या राज्य सशस्त्र पोलिस दलाच्या 9व्या बटालियनमध्ये कुलदीप तोमर नावाचा कर्मचारी आहे. तोमर यांची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. आईच्या देखभालीसाठी 10 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज तोमर यांनी दिला होता. मात्र, आईच्या तब्येतीच्या कारणासोबत त्यांनी अजूनही एक कारण दिले आहे, ते कारण गमतीशीर आहे.

पत्रात तोमर यांनी लिहीले आहे की, 'माझ्या आईची तब्येत ठीक नसल्याने मला सुट्टीची गरज आहे. शिवाय, माझ्या घरी एक म्हैस असून तिला नुकतेच रेडकू झाले आहे. तिच्या सेवेसाठी सुद्धा मला सुट्टीची गरज आहे. मी लहान असल्यापासून या म्हशीचे दूध प्यायलो आहे. तिच्या दुधाचे उपकारही मला फेडायचे आहेत. तिचे दूध पिऊनच मी पोलिस भर्तीसाठी व्यायाम करत असे. तिच्यामुळेच आज मी पोलिस दलात आहे. त्यामुळे तिचे माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. तिने माझ्या वाईट काळात माझी साथ दिली आहे. आता तिची सेवा करणे माझं कर्तव्य आहे.'

दरम्यान, तोमर यांचे हे पत्र व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठांनी खडसावले आहे. पण, तोमर यांनी हे पत्र आपण लिहीलेच नसल्याचे म्हटले आहे.

Title: madhya pradesh police leave application viral on social medi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे