जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्याचा खात्मा

जम्मु काश्मीर : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात लारनू भागात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. सुरक्षा दलाकडून अजूनही कारवाई सुरू आहे.

अनंतनागच्या लारनू भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली होती. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सुरक्षा दलाकडून अजूनही कारवाई सुरू आहे. शुक्रवारी बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. सुरक्षा दलाने बुधवारी शोपियामध्ये शोधमोहिम राबवून दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा हंगाम सुरू झाल्याने दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. मात्र, सुरक्षा दल सतर्क असून दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा कारवाया वाढत असल्याने सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शोध मोहिम हाती घेतली असून ऑपरेशन ऑल आऊटलाही गती देण्यात येत आहे.

Title: Killing of a terrorist in Anantnag Jammu and Kashmir
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे