मुलासोबत AK 47 घेऊन बसलेल्या आईला पोलिसांकडून अटक

मुलासोबत आई बसली होती AK 47 घेऊन

नसीमा बानो या हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर तौसीफ शेख याची आई आहे. तौसीफला २००८ मध्ये कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते.

श्रीनगर :  दहशतवादी मुलासोबत एके ४७ घेऊन बसलेल्या एका आईला जम्मू काश्मीर पोलिसांनी यूएपीए ( Unlawful Activities Prevention Act) कायद्यांतर्गत अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये नसीमा बानो (वय ५५) या महिलेने आपल्या दहशतवादी मुलासोबत एके ४७ घेऊन फोटो काढला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर तिला २० जूनला अटक करण्यात आली आहे.

नसीमा बानो या हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर तौसीफ शेख याची आई आहे. तौसीफला २००८ मध्ये कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते. तसेच ती काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या अब्बास शेख याची बहिण आहे. दहशतवाद्यांना कारवायांसाठी प्रवृत्त करणे, प्रशिक्षण यामध्ये तिचा प्रमुख सहभाग होता. नसीमाच्या लहान बहिणीचा २० जूनपासून शोध घेण्यात येत आहे. सध्या नसीमाला अनंतनागमध्ये ठेवण्यात आले आहे. 

Title: Jammu and Kashmir Police arrests slain militants mother
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे