रखवालदाराच्या चार मुलांची निर्घृण हत्या; पाच ताब्यात

एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले.

जळगाव: एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुर्‍हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना बोरखेडा (ता.रावेर) रोडवर घडली असून, या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.

अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

सविता मेहताब भिलाला (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व राणी (वय ५) अशी हत्या करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत. शेतातील रखवालदार पती पत्नी गावाला गेले असताना ही घटना घडली. रावेर शहरापासून जवळच असलेल्या बोरखेडा रोडवरील मुस्तफा यांच्या केळीबागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व मोठ्या मुलासह मुळगावी गढी (ता. बिस्टान जि. खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी गेला होता. गुरुवारी (ता. 15) रात्री घरात गाढ झोपलेल्या सविता, राहुल, अनिल व राणी या चारही मुलांची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्‍हाडीने घाव घालून हत्या केली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेची धडाकेबाज कारवाई

दरम्यान, एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले. चौघांचे मृतदेह हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळी उशिरा आल्याने यापैकी मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून, उर्वरित तिघांचे आज करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे शवविच्छेदन इन कॅमेरा झालेले नाही़ वैद्यकीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे़.

जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणारे युवक ताब्यात

नेमके काय झाले?
शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेतमालक शेख मुस्तफा (रा. मण्यारवाडा, रावेर) शेतात आले. रखवालदाराच्या घरात डोकावून पाहिले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. घरात खाटेवर एकट्या झोपलेल्या १४ वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हे क्रूर कृत्य झाले असावे, असा संशय आल्याने त्यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिली.

महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीने शान वाढलीः गृहमंत्री

या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून साहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस पथक चौकशी करत आहे. दरम्यान, महेताबचा मोठा मुलगा संजय याने त्याच्या काही मित्रांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यावरून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

Title: jalgaon crime news four child murder case five arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे