पोलिसांची कत्तलखान्यावर धडाकेबाज कारवाई...

जालना: नवीन जालना येथील चमडा बाजार भागातील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी पहाटे धडाकेबाज कारवाई करत चार जनावरांची सुटका केली. पोलिसांवर परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जालना: नवीन जालना येथील चमडा बाजार भागातील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी पहाटे धडाकेबाज कारवाई करत चार जनावरांची सुटका केली. पोलिसांवर परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवीन जालना येथे रफिक रशीद कुरेशी याचा अवैध कत्तलखाना आहे. या कत्तलखान्यात जनावरे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, सदर बाजार पोलिस ठाण्याचे संजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांच्यासह पोलिस कर्मचारी सुधीर वाघमारे, बाबा गायकवाड, स्वप्नील साठेवाड, योगेश पठाडे, सोपान क्षीरसागर, देवाशीष वर्मा, चालक बी. डी. कासारे, गणेश जाधव आदी सहभागी झाले होते. या धाडीत तीन बैल, एक म्हसीचे वासरू असे चार जनावरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे आढळून आहे.

पोलिस वेळीच पोहचल्याने या जनावरांचे जीव वाचला. यावेळी कत्तलखान्यात कापलेल्या जनावरांचे 38 शिंगे आढळून आले असून, पोलिसांनी 1 लाख 49 हजार रुपये किमतीचे तीन मोठे बैल, एक वासरू, चार सुरे, दोन कुऱ्हाडी, कापलेल्या जनावरांची 38 शिंगे जप्त केली आहेत. पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी रफिक कुरेशी याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Title: jalana police save four animals life
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे