जालना पोलिसांना छोटा हातपंप दिसला अन्...

गुन्हेगार चोरी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. पण, पोलिस गुन्हा शोधून काढतातच. एकाने आपली चोरी सापडू नये, कल्पना लढवली. पण, पोलिसांच्या नजरेतून चोरी सुटली नाही आणि जाळ्यात अडकलाच.

जालना: गुन्हेगार चोरी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. पण, पोलिस गुन्हा शोधून काढतातच. एकाने आपली चोरी सापडू नये, कल्पना लढवली. पण, पोलिसांच्या नजरेतून चोरी सुटली नाही आणि जाळ्यात अडकलाच.

जालना जिल्ह्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे ठिकठिकाणी हातपंप आहेत. पण, गावठी दारूचा हातपंपही आहे, हे कोणी सांगितले विश्वास बसणार नाही. मात्र, हे सत्य आहे. जालना पोलिसांच्या दारूबंदी पथकाने केलेल्या छापेमारीत हे समोर आले आहे. लोहार मोहल्ल्यात असलेला गावठी दारूचाच हातपंप पाहून पोलिसही चक्रावले आहेत.

लोहार मोहल्ला परिसरात लपून-छपून गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती जालना पोलिसांच्या दारूबंदी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, सय्यद उस्मान,रामेशवर बघाटे, आर.टी. वेलदोडे, सुरेश राठोड, राम पेव्हरे, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव अलका केंद्रे, रत्नमाला एडके आणि धोंडीराम मोरे यांनी लोहार लोहल्ल्यात छापेमारी केली. परंतु पोलिसांना तिथे काहीच आढळून आले नाही. दरम्यान घराच्या एका खोलीतील फरशीवर त्यांना छोटा हातपंप दिसला. पोलिसांनी तपासणी केली असता त्या फरशीखाली दारूचा हौद असून, हातपंपाच्या साह्याने दारू बाहेर काढून विक्री केली जात असल्याचे दिसून आले. भूमिगत दारूचा हौद आणि हातपंप पाहून पोलिस अधिकारी सुद्धा चक्रावून गेले.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईत सुमारे 93 हजारांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये आरोपी बबन गायकवाड याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Title: jalana police arrested illegal liquor seller
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे