Video: जवानांनी वाढदिवसासाठी केला बर्फाचा केक...

भारतमातेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र सीमवेर लढत असलेल्या शूरवीर जवानांनी आपल्या सहकाऱयासाठी बर्फाचा केक तयार करून वाढदिवस साजरा केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली: भारतमातेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र सीमवेर लढत असलेल्या शूरवीर जवानांनी आपल्या सहकाऱयासाठी बर्फाचा केक तयार करून वाढदिवस साजरा केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून सोशल मीडिया नेटिझन्स भावूक झाले आहेत. आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार जवान एकत्र मिळून आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. आजूबाजूला असलेल्या बर्फाचा केक तयार केला आहे. या केकवर मोठ्या अक्षरात बाबू असे नाव लिहिले आहे. एका जवानाने केक कापल्यानंतर त्यांचे मित्र बर्फाचा तुकडा केकप्रमाणे उचलून आपल्या मित्राच्या तोंडाला लावत आहे. हार्टशेपचा हा केक आहे. यासोबतच हे जवान हॅप्पी बर्थडेचे गाणे सुद्धा म्हणत आहेत. मित्राला आनंद देण्यासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसताना सैनिक मित्रांनी शक्कल लढवून बर्फाचा केक तयार केला आहे. केक कापण्यासाठी सुरी ऐवजी लांबच लांब काठीचा वापर जवानांनी केला आहे.

दरम्यान, जवानांना कधीही कोणताही सण किंवा आपला वाढदिवस मनमोकळेपणाने साजरा करता येत नाही. आपल्या कुटुंबाला भेटता येत नाही. संपूर्ण देशाला रोज आपले वाढदिवस किंवा सण उत्सव शांतनेने साजरे करता यावेत यासाठी सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून लढत असतात. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. अंग गोठवणाऱ्या थंडीत, आहे त्या स्थितीत जवान आपला आनंद साजरा करत आहेत. १३ सेकंदांच्या या व्हिडीओने अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

Title: indian soldier celebrate birthday video viral
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे