पॅरिसमध्ये हल्लेखोरानं शिक्षकाचं डोकं कापलं

फ्रान्स : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी (16 ऑक्टोबर) एका शिक्षकावर हल्लेखोराने चाकूने हल्ला केला आणि त्याचं डोकं कापलं असल्याची घटना उघडकिस आली.

फ्रान्स : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी (16 ऑक्टोबर) एका शिक्षकावर हल्लेखोराने चाकूने हल्ला केला आणि त्याचं डोकं कापलं असल्याची घटना उघडकिस आली.

हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याच्यावर गोळीबार करण्याची वेळ पोलिसांवर आली. पोलिसांनी या हल्लेखोराचं नाव अद्याप जाहीर केले नाही.ज्या शिक्षकाचे हल्लेखोराने डोके कापले, त्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना 'शार्ली एब्दो'मध्ये प्रसिद्ध झालेले मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र दाखवलं होतं, अशी माहिती मिळते आहे.

स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला असून, दहशतवादविरोधी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालं.फ्रान्सचे शिक्षणमंत्री ज्या मायकल ब्लँकर यांनी ट्वीट करून म्हटलं की, "एका शिक्षकाला ठार करणं म्हणजे सरळ सरळ फ्रान्सवर हल्ला करण्यासारखं आहे."इस्लामिक दहशतवादाला आपल्या एकतेमधूनच उत्तर देऊ शकतो, असंही ते म्हणाले.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी हल्ल्याच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि या घटनेप्रकरणी 'क्रायसिस सेंटर'ही बनवलं गेलं.फ्रान्सच्या संसदेत सर्व सदस्यांनी उभं राहून शिक्षकाला श्रद्धांजली अर्पण केली. 'अत्यंत क्रूर दहशतवादी हल्ला' असं फ्रान्सच्या खासदारांनी या हल्ल्याचं वर्णन केलं आहे.हल्लेखोराने चाकूने शिक्षकावर हल्ला करत, शिक्षकाचं डोकं कापलं. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याच्या बेतात होतात. मात्र, पोलिस सावध होत त्याचा पाठलाग करू लागले.हल्लेखोराला शरण येण्यास सांगितलं गेलं. मात्र, त्याने ते ऐकलं नाही, शिवाय पोलिसांना धमकी दिली. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करणं भाग पडलं आणि त्यात हल्लेखोर ठार झाला.हल्ल्याचं घटनास्थळ पूर्णपणे सील करण्यात आलं असून, तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळाच्या परिसरात न येण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

Title: In Paris an attacker beheaded a teacher
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे