Video: पतीला रंगेहात पकडलं; मग काय राडाच...

नवऱयाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडल्यानंतर पत्नीने रस्त्यावर राडा घातला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई : नवऱयाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडल्यानंतर पत्नीने रस्त्यावर राडा घातला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईमधील पडेर रस्त्यावर ही घटना घडली. यावेळी पोलिसही उपस्थित होते.

महिलेने आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पकडले, आणि रस्त्यातच भांडणाला सुरुवात झाली. यामुळे काही काळ ट्रॅफिकही जाम झाले होते. या सगळ्या हायवोल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ही महिला रस्त्यातच मोटार थांबवून पतीच्या मोटारच्या समोर जाऊन उभी राहताना दिसत आहे. ती पतीला मोटारच्या बाहेर येण्यास सांगते, यासाठी तिने रस्त्यातच मोटार थांबवून ठेवली. ही महिला आपली पतीचा पाठलाग करत असावी. कारण व्हिडीओमध्ये आपली मोटार थांबवून ती पतीच्या मोटारसमोर उभी राहते.

मोटारीमध्ये पतीला एका मुलीसोबत बसलेले पाऊन या महिलेचा पारा चढतो. रस्त्यातच मोटारवर ती चप्पल फेकून मारते. बोनेटवर चढून बसते. मोटारची काचही खाली करण्याचा प्रयत्न करते पण महिलेचा पती मोटारतून बाहेर उतरत नाही. हा सगळा ड्रामा सुरू असताना पेडर रोडवर जाम झाला. हा सगळा ड्रामा पाहून ट्रॅफिक पोलिसही पोहचले. त्यांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने कोणाचे ऐकले नाही.

मोटारच्या बोनेटवर चढून काढला राग
रागात महिलेने मोटारच्या काचेवर चप्पल फेकून मारली. बोनेटवर चढून मोटारची काच फोडण्याचा प्रयत्न करत होती. अखेर पती मोटारच्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर महिलेने त्याला कॉलरला पकडून ओढले आणि लाथा बुक्क्याने मारण्यास सुरुवात केली. नंतर ती महिला आपल्या पतीसह मोटारीत बसली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर पुन्हा खाली उतरली आणि हाणामारी करू लागली. महिलेने पतीवर हल्ला केला तेव्हा पोलिसांनीही हस्तक्षेप केला. हा गोंधळ बराच काळ सुरू होता, यामुळे पेडर रोड काही काळ जाम झाला होता. दरम्यान, याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.

Title: husband is with girl friend in the car caught by wife at mum
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे