हुतात्मा जवान काळेंच्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी देणार

हुतात्मा जवानाच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत

पानगाव (ता. बार्शी) येथे हुतात्मा काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची देशमुख, टोपे आणि भरणे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

सोलापूर : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जवान सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

पानगाव (ता. बार्शी) येथे हुतात्मा काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची देशमुख, टोपे आणि भरणे यांनी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत, संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.

हुतात्मा काळे यांचे कुटुंब जिरायती शेतीवर अवलंबून आहे. मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची मागणी त्यांच्या भाचीने केली. यावर उत्तर देताना अनिल देशमुख यांनी आम्हाला हुतात्मा काळे यांचा अभिमान आहे. सरकार खंबीरपणे कुटुंबाच्या पाठिशी आहे. 

शासकीय मदतीबरोबरच खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितले. यावेळी जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, मुले श्री आणि आयुष, भाऊ नंदकुमार आणि किरण काळे उपस्थित होते.  

Title: Home minister Anil Deshmukh visit to martyred jawan family
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे