पोलिसांच्या गौरवार्थ गायलेल्या गाण्याचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

पोलिसांच्या गौरवार्थ विशेष गीत

पोलिसांच्या या कार्याच्या गौरवार्थ बॉलिवूडमधील आघाडीचे संगीतकार रुपकुमार राठोड यांनी तुम्हे सलाम या शिर्षकाखाली गाणे बनविले आहे.

मुंबई : कोविड १९च्या (कोरोना) विषाणूने देशभरात थैमान घातले असताना, सामान्य नागरिकांची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या गौरवार्थ गायलेल्या विशेष गाण्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.

कोरोना योध्यांचे देशभरात कौतुक होत आहे. पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा विशेष करून गौरव करण्यात येत आहे. पोलिस आपल्या जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावित आहेत. पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला जात असून, विविध क्षेत्रातून पोलिसांच्या कामाचे कौतुक करण्यात येत आहे. 

पोलिसांच्या या कार्याच्या गौरवार्थ बॉलिवूडमधील आघाडीचे संगीतकार रुपकुमार राठोड यांनी तुम्हे सलाम या शिर्षकाखाली गाणे बनविले आहे. रुपकुमार राठोड, सुनाली राठोड आणि रिवा राठोड यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याला यू ट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. #TumheSalaam हे गीत स्वरबद्ध केल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

Title: Home Minister Anil Deshmukh applauds song for police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे