कोरोनामुळे जीव गमाविलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांसाठी मोठी घोषणा

पोलिसांसाठी गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांना आता पोलिसाच्या निवृत्तीच्या कालावधीपर्यंत सरकारी घरांमध्ये राहाता येणार आहे. याबाबतचा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यातील तीन पोलिसांच्या कुटुंबीयांसह राज्यातील 54 पोलिसांच्या कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे.

मुंबई : कोरोनामुळे मृत्यु झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांना आता पोलिसाच्या निवृत्तीच्या कालावधीपर्यंत सरकारी घरांमध्ये राहाता येणार आहे. याबाबतचा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे पुण्यातील तीन पोलिसांच्या कुटुंबीयांसह राज्यातील 54 पोलिसांच्या कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे.

पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबांना तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सरकारी घर मोकळे करावे लागते. मात्र मागील साडे तीन महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कर्तव्य बजावत असताना आत्तापर्यंत मुंबई, पुण्यासह राज्यातील 54 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान सरकारी नियमानुसार, तीन महिन्यात घर खाली करणे बंधनकारक असल्यामुळे कोरोनामुळे मृत्यु झालेल्या पोलिसांचे कुटुंब अक्षरश: हवालदिल झाले होते. कर्तव्य बजावत असताना पोलिसांचा मृत्यु झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात सवलत देण्याची मागणी केली जात होती.

या प्रश्नाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली. तसेच त्यांनी याबाबत महत्वाची भूमिका घेतल्याचेही स्पष्ट केले. देशमुख म्हणाले, "राज्यात 54 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. या कुटुंबांना संबंधित पोलिसाच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत सरकारी घरात राहाता येईल. त्यादृष्टिने सुचना दिल्या आहेत."

मृत्यु झालेल्या पोलिसांची संख्या व ठिकाण
शहर/जिल्हा/विभाग               मृत्यु

मुंबई                    -             32
पुणे                      -             03  
नाशिक ग्रामीण       -             03
ठाणे                     -             02
मुंबई रेल्वे              -             02
सोलापूर शहर        -              02
जळगाव                -              01
पालघर ग्रामीण      -              01
एटीएस                 -              01
एसआरपीएफ ग्रुप नं - 4 -       01   


राज्याच्या पोलिस दलातील कोरोनाची स्थिती
                          अधिकारी       कर्मचारी

एकुण पॉझिटिव्ह      450            3821
कोरोनामुक्त              330            2793
मृत्यु                         02              46
एक्टिव पॉझिटिव्ह      118            982

Title: help to police families says home minister Anil Deshmukh
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे