हाथरस प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे

नवी दिल्ली : हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने अधिकृतपणे आज स्वीकारला.

नवी दिल्ली :  हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने अधिकृतपणे आज स्वीकारला.

हाथरसमधील 19 वर्षीय मुलीवर 14 सप्टेंबर रोजी चार जणांनी कथित सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेली ही युवती घटनेनंतर 15 दिवसांनी दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मरण पावली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या युवतीच्या पार्थिवावर घाईघाईने अंतिम संस्कारही उरकले होते.

या युवतीचा मृत्यू आणि घाईघाईने करण्यात आलेल्या अंत्यसंस्कारांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. त्यातच बलात्काराचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटल्यामुळे लोकभावना अधिकच संतप्त झाल्या होत्या.या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणचा तपास 'सीबीआय' कडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.

Title: Hathras case now under investigation by CBI
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे