दरोडा टाकणाऱ्या अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड

सराफी पेढी बंद दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागीने दोन पिशव्यांमध्ये भरून घरी जाण्याच्या तयारीत होते. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी शस्त्राचा धाक दाखवून मोटारीमध्ये ठेवलेल्या सोने-चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

नगरः लोणी (ता. राहाता) येथील सराफी पेढीवर दरोडा टाकणाऱया अट्टल गुन्हेगारांची टोळीला पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांच्या ताब्यातून 21 किलो 700 ग्रॅम चांदीसह साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सेक्स रॅकेटची मास्टरमाइंड राजकीय महिला गजाआड...

नवनाथ साहेबराव गोडे (वय 32, रा. सावळीविहीर, ता. राहाता), अतुल चंद्रकांत आमले (वय 24, रा. कर्वेनगर, घोसाळे, जि. पुणे), सागर गोरख मांजरे (वय 23, रा. मातापूर, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. शिवाजीनगर, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ऑनलाईन डेटिंग ज्येष्ठाला पडले महागात...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी लोणी गावातील संतोष मधुकर कुलथे हे आपली सराफी पेढी बंद दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागीने दोन पिशव्यांमध्ये भरून घरी जाण्याच्या तयारीत होते. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी शस्त्राचा धाक दाखवून मोटारीमध्ये ठेवलेल्या सोने-चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी लोणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे व लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांची पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तपासादरम्यान आरोपी पुणे जिह्यातील शिरूर येथे लपल्याची माहिती माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शिरूरमधून आरोपींना ताब्यात घेतले.

सराईत गुन्हेगाराकडुन जप्त केला एक कोटींचा मुद्देमाल

Title: gangster arrested for robbery loni rahata at nagar district
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे