फेक कॉल पडला महिलेला महागात ; 9 लाखांचा गंडा

पुणे : पोलिसांकडून सायबर क्राईमसंदर्भात सातत्याने जनजागरुती केली जात आहे. मात्र, तरीही अनेकजण यापासून कोणता धडा घेत नसल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

पुणे : पोलिसांकडून सायबर क्राईमसंदर्भात सातत्याने जनजागरुती केली जात आहे. मात्र, तरीही अनेकजण यापासून कोणता धडा घेत नसल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कुटुंबीयांसह विमाननगरमध्ये राहायला आहेत. त्यांचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहेत. 1 जुलैला फिर्यादी यांना ऑनलाईन नेट सर्फिंग करताना सायबर चोरट्याने त्यांना ऑफर देण्याच्या नावाखाली 1 हजार 499 रुपयांचे शूज खरेदी करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना फोन करून आयफोन जिंकल्याचे सांगितले. त्यासाठी जीएसटी, इन्शुरन्सची विविध कारणे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेला ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगितले.

आयफोन मिळण्याच्या अपेक्षेने फिर्यादी महिला यांनी सायबर चोरट्याच्या विविध बँकखात्यात ऑनलाईन व्यवहार करत तब्बल 9 लाख 30 हजार रुपये जमा केले. मात्र, वेळोवेळी रक्कम जमा करूननही आयफोन मोबाईल मिळत नसल्याचे लक्षात येताच फसवणुक झाल्याने त्यांनी विमानतळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे तपास करीत आहेत.

Title: Fake calls cost woman dearly 9 lakh gang
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे