फेसबुकवरील 'कपल चॅलेंज'पासून सावधान...

फेसबुकवर गेल्या काही दिवसांपासून कपल चँलेजच्या नावाखाली अनेकजण छायाचित्रे अपलोड करत आहेत. उच्चशिक्षितांपासून सामान्य नागरिक पत्नीसोबतचे छायाचित्रे फेसबुकवर प्रसारित करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एक ट्विट करीत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पुणेः सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर 'कपल चँलेज'च्या नावाखाली अनेकजण छायाचित्र अपलोड करीत आहेत. पण, सायबर गुन्हेगारांकडून तुमच्या छायाचित्रांचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे. छायाचित्र मॉर्फ होण्याची शक्यता असल्याचा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे.

बहिणीचा मोबाईल नंबर डिलीट कर म्हटल्यावर...

फेसबुकवर गेल्या काही दिवसांपासून कपल चँलेजच्या नावाखाली अनेकजण छायाचित्रे अपलोड करत आहेत. उच्चशिक्षितांपासून सामान्य नागरिक पत्नीसोबतचे छायाचित्रे फेसबुकवर प्रसारित करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एक ट्विट करीत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागेल. शिवाय, फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा पोलिसांनी ट्विटद्वारे दिला आहे.

पोलिसांनी २४ तासांत लावला गुन्ह्याचा छडा; पाहा काय केले जप्त

सायबर गुन्हेगारांनी यापूर्वी सोशल मीडियावर छायाचित्रांचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबती माहिती अनेकदा प्रसारीत झाली आहे. तरी पण अनेकांकडून कोणताही विचार न करता बिनधिक्कपणे छायाचित्रे प्रसारित केले जात आहेत. महिलांच्या छायाचित्रांमध्ये फेरफार करून अश्लील वेबसाईटवर अपलोड केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अनेकांना कौटुंबिक तणावाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अशा प्रकारची छायाचित्रे प्रसारित करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एकतर्फी प्रेमातून सायबर गुन्हेगारांनी महिलांसह तरुणींच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी अश्लील छायाचित्रे प्रसारित केली आहेत.

ऑनलाइन फसवणूकीचे लाखो रुपये पोलिसांनी दिले मिळवून!

दरम्यान, सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो अपलोड केल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यापुर्वी अशा घटना घडल्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. दररोजच्या वेगवेगळ्या चॅलेंजमुळे सायबर चोरट्यांकडून छायाचित्रांचा वापर मॉर्फ करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी फोटो शेअर करु नये, असे आवाहन सायबर विभागाचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी केले आहे.

बॅंकेच्या कस्टमर केअरमधून बोलतोय म्हणाला अन्...

Title: facebook couple challenge photo care of cyber crime police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे