पोलिस दलातील श्वान राधाने शोधून दिला लाखोंचा माल

पुणे : पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्यानंतर गुन्हेगाराने दडवुन ठेवलेला लाखो किंमतीचा मुद्देमाल शोधुन देण्यात पोलिस दलातील श्वान राधाने महत्वाची भुमिका बजावली असुन श्वान पथकाला पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी बक्षिस जाहिर केले असल्याची माहिती पुणे ग्रामीण गु्न्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे : पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्यानंतर गुन्हेगाराने दडवुन ठेवलेला लाखो किंमतीचा मुद्देमाल शोधुन देण्यात पोलिस दलातील श्वान राधाने महत्वाची भुमिका बजावली असून श्वान पथकाला पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी बक्षिस जाहिर केले असल्याची माहिती पुणे ग्रामीण गु्न्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

कामशेत येथील पवनाचैक, पवनानगर रोड येथे सराईत गुन्हेगाराचे घरातुन पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठया प्रमाणात गांजाचा अवैध साठा जप्त केला.हि आता पर्यंतची जिल्हयातील सर्वात मोठी कामगिरी असुन याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले कि, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनीत कॉंवत यांना गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली होती कि, संतोष रामचंद्र वाळुंज (रा.दौंडे कॉलनी, पवना नगर रोड, कामशेत ता.मावळ) व धनाजी विठ्ठल जिटे (रा.ताजे, ता.मावळ, सध्या रा. संतोष वाळूंज चाळ, पवनाचैक, पवनानगररोड, कामशेत) हे पवनाचौक, पवानगररोड लगत असणारे संतोष वाळूंज हा त्याचे राहते घरात गांजा नावाचा अंमली पदार्थाचा साठा स्वतःचे बेकायदा कब्जात बाळगून आहेत, अशी खात्रीशिर बातमी मिळाली होती. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांचेशी संपर्क साधला व त्यानंतर पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिलेल्या सुचनेनुसार कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पोलिस कर्मचारी तसेच श्वान पथकासह मिळाले बातमी ठिकाणी छापा घातला असता दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन आरोपी संतोष रामचंद्र वाळूंज याचे राहते घराची घरझडती घेतली असता बैठकीचे खोलीचे तळघरात ५७८ किलो असा एकूण किंमत रूपये ८६ लाख ७७ हजार ५०० रूपये चा अवैध अंमली पदार्थ गांजाचा साठा मिळून आला. या प्रकरणी आरोपींवर एन.डी.पी.एस.कायदयान्वये कामशेत पेालीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान याबाबत पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी माहिती देताना सांगितले कि, पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रथम आरोपींना ताब्यात घेतले. माञ, आरोपींनी गांजा हा घरात लपवून ठेवला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकातील श्वान राधाने याबाबत घरात शोध घेत आरोपीने दडवून ठेवलेला माल शोधुन दिला. या श्वान पथकातील श्वान राधाचे पुणे ग्रामीण चे पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी कौतुक करत दहा हजारांचे बक्षिस जाहिर केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

हि कामगिरी  लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत, पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, कामशेतचे पोलिस निरीक्षक विठठल दबडे, गु्न्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहायक फौजदार विजय पाटील, दत्तात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, अजय दरेकर, महेंद्र वाळुंजकर, मुकुंद आयाचित, राजेंद्र पुणेकर, रौफ इनामदार, गणेष महाडीक, संतोष शिंदे, संदीप शिंदे, हनुमंत माने, ए.डी.कवठेकर, एस.एस.डोईफोडे, एस.एम.वाडेकर, ए.व्ही.पवार, नामदेव खैरे तसेच श्वान पथकाचे राम जगताप, दत्तात्रय मोरे, दत्ता शिंदे, सचिन गायकवाड, समाधान नाईकनवरे, श्वान राधा, श्वानपथक यांनी हि कामगिरी केली.

Title: dog squad radha detected ganja in kamshet
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे