नितीन सुपेकर यांच्या ‘आटपाडी नाइट्स’ला सहा पुरस्कार

सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न म्हणजे लग्न. प्रत्येक टप्प्यातील रसभरित वर्णनं सांगितली जातात किंवा चवीचवीने चघळली जातात, पण अखेरच्या टप्प्याचं काय? अर्थात मधुचंद्राबद्दल बोलण्याची किंवा जाहीर वाच्यता करण्याची पद्धत आपल्यात नाही.

मुंबईः सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे सहा पुरस्कार ‘आटपाडी नाइट्स’ या चित्रपटाने पटकावली आहेत. नितीन सुपेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

मराठीतील प्रतिष्ठित झी गौरव २०२० पुरस्कारांची नामांकने ६ मार्च २०२० रोजी पार पडली. त्यानंतर करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकताना अटीशर्तींसह चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. चित्रीकरणाचे सर्व नियम पाळत झी गौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘आटपाडी नाइट्स’ या चित्रपटांना सर्वाधिक पुरस्कार मिळाले. ‘आटपाडी नाइट्स’च्या टीमने सर्वाधिक पुरस्कार मिळविल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न म्हणजे लग्न. प्रत्येक टप्प्यातील रसभरित वर्णनं सांगितली जातात किंवा चवीचवीने चघळली जातात, पण अखेरच्या टप्प्याचं काय? अर्थात मधुचंद्राबद्दल बोलण्याची किंवा जाहीर वाच्यता करण्याची पद्धत आपल्यात नाही. प्रामुख्याने ग्रामीण भाग लैंगिक शिक्षण आणि वैवाहिक संबंधासारख्या विषयाशी चार हात लांबच आहे. साहजिकच मग आजचे सोशल मीडियात गुरफटलेले तरुण चुकीच्या मार्गाला जाऊन आपल्या "प्रेमाचा जांगडगुत्ता' करून घेतात. अज्ञानाच्या वारूवर स्वार होऊन ते घोडचूक करून बसतात नि मग भरकटलेली वैवाहिक जीवनाची गाडी रुळावर आणताना नाकीनऊ येतात. प्रेम, संयम, संवाद आणि समजूतदारपणाने अशा संकटावर मात करता येते. चित्रपटाच कथा मोठी रंजक आहे. चित्रपटामध्ये प्रणव रावराणे आणि सायली संजीव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. लैंगिक समस्येसारखा बंद दाराआडचा संवेदनशील विषय नितीन सुपेकर यांनी खुसखुशीत भाषेत उलगडून दाखवला आहे.

Title: director nitin supekar aatpadi nights gor six awards zee gau
प्रतिक्रिया (1)
 
नितीन विजय सुपेकार
Posted on 29 August, 2020

सुंदर आणि प्रभावी खूप खूप धन्यवाद

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे