नागपुरमध्ये दोघांकडुन घातक शस्ञे जप्त

नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असुन तलवार, सुरी सारखे 10 घातक शस्त्र आरोपींकडुन जप्त करण्यात आले आहेत.

नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असुन तलवार, सुरी सारखे 10 घातक शस्त्र आरोपींकडुन जप्त करण्यात आले आहेत.

आरोपी प्रतीक फुलझेले याच्या घरात तलावार, चाकुसारखे घातक शस्त्र लपवून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पेट्रोलिंगवर असलेल्या गुन्हे शाखा पोलिसांना माहिती मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी सापळा रचला आणि त्याच्या घरातून शस्त्र हस्तगत केले. यात तलवार, चाकूसारखे 10 घातक शस्त्र मिळाले.

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असुन  शस्त्र विषयी विचारणा केली असता ते शस्त्र मोक्काच्या आरोपात जेलमध्ये असलेल्या रजत शर्मा नावाच्या आरोपीने ठेवण्यासाठी दिले असल्याचं प्रतीक फुलझेले याने पोलिसांना सांगितलं.

Title: Dangerous weapons seized from both in Nagpur
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे