Video: पोलिसकाकांनी घेतली हातात बॅट अन्..

औरंगाबाद पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिस रस्त्यावर उतरून क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

औरंगाबाद : देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनदरम्यान नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस अहोरात्र रस्त्यावर उभे आहेत. मात्र, पहिल्यांदाच पोलिसांनी हातात दंडुके नाही तर बॅट घेतली आहे. औरंगाबाद पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पोलिस रस्त्यावर उतरून क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर खुर्चीचा स्टम्प करून पोलिस क्रिकेट खेळत आहेत. एक पोलिस गोलंदाजी करताना दिसत आहेत, तर काही पोलिस फिल्डिंग करताना दिसत आहेत. शिवाय, संकटाच्या काळातही आपली जबाबदारी सांभाळून काही प्रमाणात आनंद लुटताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्ये रस्ते सुनसान आहेत, त्यामुळे पोलिसांनी विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. संपूर्ण कोरोना लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी आपला जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावले आहे. यात अनेक पोलिसांनी आपले प्राणही गमावले. मात्र, पहिल्यांदाच पोलिस विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

दरम्यान, औरंगाबादचा हा व्हिडीओ मजेशीर असून, काही प्रमाणात संचार बंदीमध्ये ऑन ड्युटी 24 तास असलेले पोलिस आनंद लुटताना दिसत आहेत. सध्या मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे शहरात कडक संचारबंदी लागू होण्याची शक्यता आहे.

Title: corona virus lock down time aurangabad police playing
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे