पोलिसांच्या कुटुंबियांना पंधरा कोटी रुपयांचे वाटप...

राज्यात कोरोनाशी लढताना मृत्यू झालेल्या मुंबई पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचा-या कुटुंबियांना आतापर्यंत पंधरा कोटी दहा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाशी लढताना मृत्यू झालेल्या मुंबई पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि कर्मचा-या कुटुंबियांना आतापर्यंत पंधरा कोटी दहा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यात 31 पोलिसांचा समावेश असून, यातील 24 पोलिसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाख रुपये असे 12 कोटी रुपये तर 31 पोलिसांना मुंबई पोलिस फाऊंडेशनकडून प्रत्येकी दहा लाख रुपये असे 3 कोटी 10 लाख रुपये देण्यात आले आहेत.

उर्वरित मृत पोलिसांच्या कुटुंबियांना लवकरच सानुग्रह आणि नुकसानभरपाई म्हणून साठ लाख रुपये देण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसात मुंबई शहरात करोनाचा कहर वाढत असून, त्याचा सर्वाधिक फटका मुंबई पोलिसांना बसला आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई पोलिस दलातील 36 पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर सुमारे अडीच हजार पोलिस करोनाबाधित झाले आहेत. तरीही कर्तव्यात कुठलाही कसूर न ठेवता पोलिसांचा करोनाविरुद्ध् लढा सुरुच आहे.

पोलिस मुख्यालयातर्फे पोलिस कल्याण विभाग, विविध सामाजिक संस्था, फार्मास्टिकल कंपन्या, वित्तीय संस्थेकडून पोलिस दलासाठी 47 हजार 340 लिटर सॅनिटायझर, दोन लाख 17 हजार डिस्पोजेबल आणि कापडी मास्क, पंधरा हजार सर्जिकल हॅण्ड गोल्व्हज, सोळाशे फ्लास्क रेनसूट, शंभरहून वॉटर डिस्पेन्सर मशीन, सहा हजार पीपीई, दोन हजार गॉगल, तेरा हजार फेस शिल्ड, 24 ऍक्रेलिक शिट, नाकाबंदीसाठी 13 हजार 534 पाण्याचा बाटल्या, शरीरातील ऑक्सिजन मोजण्यासाठी 247 पल्स ऑक्सिमीटर मापक यंत्र, 952 स्मार्ट वॉच, 160 टेंपरेचर गन, 137 सॅनिटायझर डिस्पेन्सर स्टॅण्ड, कालिना, मरोळ आणि पोलिस जिमखानासाठी सात हजार हायजीन किट असे सुमारे साडेसात कोटी रुपयांचे औषधांसह इतर पुरविण्यात येत आहे.

पोलिसांसाठी खास हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. पोलिसांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर दोन हजार 213 पोलिसांनी संपर्क साधला असून एक हजार 633 पोलिसांना कोव्हीड सेंटरसह विविध रुग्णालयांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. शहरात विविध ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. कलिना येथील पहिल्या इमारतीमध्ये 275, दुस-या इमारतीमध्ये 150, मरोळ येथे 256 तर पोलिस जिमखाना येथे 46 बेड असे एकूण 726 पोलिसांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमधील बाधित पोलिसांसाठी सात हजार हायजीन किटचे वाटप करण्यात आले आहे.

करोनाविषयी शंका उत्पन्न होत असल्याने महानगरपालिकेकडून ताप तपासणी केंद्र सुरु करण्यात आले असून, आताापर्यंत एक हजार 757 तपासण्या झाल्या आहेत तर 381 पोलिसांचे स्वॅब घेण्यात आले आहे.

पोलिसांसाठी गृहमंत्र्यांची मोठी घोषणा...

Title: corona virus fifteen crore given mumbai police covid yoddhas
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे