आजचा वाढदिवसः एसपी मोक्षदा पाटील

औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील [IPS] यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

मोक्षदा अनिल पाटील
कावपिंपरी, ता. अमळनेर, जिल्हा जळगाव.

अनिल ओंकार पाटील ठाणे महानगर पालिकेत अभियंता त्यांना दोन मुली. दोघींनीही त्यांचा मार्ग निवडला आणि त्या आयुष्यात त्यांचा मार्गावर यशस्वी सुध्दा झाल्या. मोक्षदा पाटील यांनी मुंबई येथील झेविअर्स महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुकार या सामाजिक संस्थेत काम केले. पुणे येथे UPSC ची तयारी केली. २०११ साली आयपीएस अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील या नागपूर व नाशिक येथे परीवेक्षाधीन पोलिस अधिकारी होत्या. त्यानंतर जळगाव येथे अप्पर पोलिस अधीक्षक पदी असताना हिंदू मुस्लीम एक्यासाठी भरीव कामगिरी केली. वाशीम नंतर सध्या त्या औरंगाबाद जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक पदावर आहेत. वाशीम शहरातील रोड रोमिओना चांगलाच धडा शिकवला. माफिया व गुंडांना चांगलाच धडा शिकवला आहे. यामुळे त्यांची स्तुती सहकारी अधिकारी व कर्मचारी सुध्दा करत आहे.

एक कठोर पोलिस अधिकारी व सोबत एक प्रेमळ आई या भूमिका उत्तम रित्या पार पाडत आहेत. २०१३ साली आस्तिककुमार पांडे यांच्या सोबत मोक्षदा पाटील यांचा विवाह झाला. आस्तिककुमार हे आयएएस आहेत.औरंगाबादच्या पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी गुंडाच्या मुसक्या आवळत स्वतःची धाक निर्माण केला आहे. महाराष्ट्रात सध्या लेडी सिंघम म्हणून मोक्षदा पाटील यांना ओळखण्यात येते. लेडी सिंघम यांना www.policekaka.com तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

Title: aurangabad sp mokshada patil birthday celebrate policekaka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे