राज्यात लवकरच पोलिसभर्ती: गृहमंत्री

राज्यामध्ये रखडलेली आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया लवकरच घेतली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे बोलताना सांगितले.

सांगली: राज्यामध्ये रखडलेली आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया लवकरच घेतली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे बोलताना सांगितले. कोरोनाच्या युद्धात मृत्यू पावलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

श्री. देशमुख हे सोमवारी (ता. 29) सांगली दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, 'कोरोनाच्या युद्धात आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घराची चिंता करू नये. सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल. सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना 58 जणांचा बळी गेला आहे, ही खेदाची बाब आहे. त्यासाठी शासन पातळीवरून 65 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय, 55 वर्षावरील 12 हजार पोलिसांना पगारी सुटी देण्यात आली आहे. 50 ते 55 वर्षातील 23 हजार पोलिसांना ताणविरहित ड्युटी देण्यात आली. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष काळजी या काळात घेतण्यात आली आहे."

'कोरोनाविरूद्ध जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरीने पोलिस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर लढत आहेत. ही अभिमानाची बाब असून, तीन महिन्यातील काम सर्वात उत्कृष्ट आहे. राज्यभरात कोरोनाने ५८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाची मदत मिळावी म्हणून ५० लाखांचे सानुग्रह अनुदान, १० लाख पोलिस महासंचालक सहायता निधी आणि ज्या बँकेत त्यांचे खाते आहे, त्या बँकेकडून काही रक्कम असे ६५ लाख रुपये देण्याचे नियोजन केले. जे कर्मचारी मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंत शासकीय निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे,' असेही देशमुख यांनी सांगितले.

Title: anil deshmukh says police officers will be appointed soon in
प्रतिक्रिया (1)
 
Afsar Khan Salim Khan pathan
Posted on 30 June, 2020

भरती व्हायला पाहिजे

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे