अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा धुमाकुळ सुरु असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अखेर ट्रम्प यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा धुमाकुळ सुरु असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ट्रम्प यांचे सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल प्रतिक्षेत होता. अखेर ट्रम्प यांनीच याबाबतची माहिती दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. होप हिक्स, कोणतीही सुटी न घेता अथक काम करत होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ट्विट मध्ये माहिती देताना  त्यांनी सांगितले कि,माझी पत्नी मेलानिया आणि मी आमच्या चाचणीचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला असुन  यादरम्यान आम्ही क्वारंटाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असे ट्रम्प म्हटले आहे तर मेलानिया यांनीही यावृत्ताला दुजोरा दिला आहे.कोरोनाचा अहवाल आल्यानंतर त्यांनी याची माहिती देत उपचार सुरु केल्याचे म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी निवडणूक डिबेट दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडन यांच्यावर टीका करताना गरज भासली तरच मास्क घालेन, असे सांगितले होते. तसेच अनेकदा त्यांनी जाहीररित्या मास्क घालणार नाही असे म्हटले होते.

Title: americas president trump tested corona positive
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे