फेसबुक लाईव्ह सुरू करून झाडली गोळी अन्...

फेसबुक लाईव्ह सुरू करून एकाने आत्महत्या करत असल्याचे सांगितले आणि पत्नीवर गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वताःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघांचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या भावानेही आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.

अलीगड (उत्तर प्रदेश): फेसबुक लाईव्ह सुरू करून एकाने आत्महत्या करत असल्याचे सांगितले आणि पत्नीवर गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वताःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दोघांचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याच्या भावानेही आत्महत्या केल्याची घटना येथे घडली.

अलिगड येथील बन्नादेवी परिसरात ही घटना घडली असून, यामध्ये शैलेंद्र, त्याची पत्नी पिंकी आणि भाऊ विशालचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच कुटुंबातील इतर सदस्य आणि स्थानिकांची गर्दी केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.  शैलेंद्रने 2 वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या पिंकीसोबत प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यापासून त्यांच्या कुटुंबामध्ये वाद सुरू होता. याच वादातून शैलेंद्रने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:देखील गोळ्या जाडून आत्महत्या केली. दोघांचा मृत्यू झाल्याचे पाहून विशालने सुद्धा गोळी झाडून आत्महत्या केली.

शैलेंद्रने फेसबुक लाईव्ह केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, 'मी आत्महत्या करतोय आणि मी मनापासून करतोय. मी जे काही करतोय ते ठीक आहे कारण मी आहे मी घरातल्यांमुळे अस्वस्थ आहे. आता मी असं आयुष्य जगू शकत नाही, असे म्हणत असतानाच त्याने पत्नीवर गोळी झाडली. संबंधित घटना फेसबुकवर गेली होती. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळ्यांचा आवाज ऐकताच शैलेंद्रचा भाऊ धावत खोलीत आला आणि त्याने भावाचा आणि वहिणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. यानंतर त्यानेही तिथेच पडलेल्या बंदूकीने स्वत:वर गोळ्या झाडल्या. यात शैलेंद्रच्या भावाचाही मृत्यू झाला.'

दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा जीव गेला आहे. त्यामुळे या प्रकरणामागचा खरा गुन्हेगार कोण? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

Title: after facebook live three dead in one family at uttar prades
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे