डॉ. श्रीरंग गायकवाड

संपादक

'सकाळ' वृत्तपत्र समूहात डिजिटल संपादक आणि कोल्हापूर विभागाचे निवासी संपादकपद भूषविलेल्या डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी पुणे विद्यापीठातून पीएच. डी. केली आहे.

 • सुमारे २३ वर्षे ते प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल या पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

 • पुणे येथील लोकमत, ऍग्रोवन, सकाळ, पुढारी आणि मुंबईत महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती या वृत्तपत्रांमध्ये तसेच आयबीएन-लोकमत, मी मराठी या न्यूज चॅनेल्समध्ये महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.

 • चित्रलेखा, लोकप्रभा या साप्ताहिकांमधून लेखन तसेच 'भारत फॉर इंडिया', 'प्रबोधनकार डॉट कॉम' या वेबसाईट उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.

 • 'रिंगण' नावाच्या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिक आषाढी अंकाचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

 • 'विठाई' या सकाळ माध्यम समूहाच्या आषाढी वार्षिक विशेषांकाचे संकल्पक, संपादक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे.

 • आयबीएन-लोकमत चॅनेलवरील 'भेटी लागी जीवा' या पंढरीच्या वारीवरील कार्यक्रमाचे प्रोड्युसर तसेच आयबीएन-लोकमत, मी मराठी, कलर्स मराठी, झी चोवीस तास, एबीपी माझा या वाहिन्यांवरून डॉ. गायकवाड यांनी संत साहित्याचे विश्लेषण केले आहे.

 • संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखा मेळा, आमदार कार्यकर्तृत्व या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे.

 • पुणे विद्यापीठात मराठी साहित्य, तर मुंबई मराठी पत्रकार संघ, बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नलिझम येथे त्यांनी पत्रकारितेचे अध्यापक म्हणून काम केले आहे.

 • सध्या www.policekaka.com या वेबसाईटचे संपादक म्हणून काम पाहात आहेत.

सचिन भारत निकम

कार्यकारी संपादक

श्री. सचिन निकम यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापण विभागात एम.ए. शिक्षण 2007 मध्ये पूर्ण केल्यानंतर ऑक्टोबर 2007 मध्ये पुढारी वृत्तपत्रातून पत्रकारितेच्या कारर्किदीला सुरवात केली. त्यानंतर मार्च 2008 मध्ये पुण्यातील अव्वल 'सकाळ' या वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळाली. प्रिंट, ऑनलाईन मिडीया अशा दोन्ही क्षेत्रात काम करण्याचा अनुभव घेता आला. गेल्या 12 हून आधिक वर्षांमध्ये वेगवेगळया विषयांवर लिहिण्याची संधी मिळाली. राजकारण क्रीडा ऑनलाईन माध्यमे अशा विविध विषयांवर सातत्याने लिखाण केल्यानंतर आता www.policekaka.com या वेबसाईटचे कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी पाहात आहेत.

Join Us:

 

अरविंद निवृत्ती तेलकर

सल्लागार संपादक

नाव - अरविंद निवृत्ती तेलकर
शिक्षण - बी. ए. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे.
सेवा -  दैनिक तरुण भारत, बेळगावमध्ये फेब्रुवारी १९८० मध्ये पत्रकारिता सुरू. उपसंपादक आणि मुख्य उपसंपादक या नात्याने १२ वर्षे सेवा. सिंधुदुर्ग आणि गोवा आवृत्त्यांच्या प्रारंभापासूनची जबाबदारी. कोल्हापूर आणि सांगली आवृत्ती सुरू करण्यामागे मोठे योगदान.

१९९० मध्ये तत्कालीन दैनिक मुंबई 'सकाळ'मध्ये रुजू. १९९९ मध्ये पुण्यात बदली. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीतून फेब्रुवारी २०१३ मध्ये निवृत्त. पत्रकारितेच्या प्रदीर्घ काळात चाकोरीबाहेरच्या राजकीय आणि सामाजिक बातम्यांचे वार्तांकन. पर्यावरणाबाबत विशेष जनजागृती करणारे लेख आणि बातम्या प्रसिद्ध. दैनिक सकाळच्या सर्व आवृत्त्यांसाठी खास तयार करवून घेतलेल्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी आणि वापरकर्त्याला सुलभ ठरतील अशा आवश्यकता निर्माण करण्यासाठी स्थापन केलेल्या कोअर टीमचा मुख्य सदस्य म्हणून नियुक्ती. सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर सर्व आवृत्त्यांमधील सहकाऱ्यांना त्याचं पूर्ण प्रशिक्षण.

 • १९८२ पासून छायाचित्रणाचा छंद. वन्यजीवन, विशेषतः पक्षीनिरीक्षणाची विशेष आवड. त्यासाठी देशभर भ्रमण.

 • छायाचित्रणाबरोबरच व्हीडिओ शूटिंग आणि एडिटिंगमध्ये प्राविण्य. दैनिक सकाळच्या ऑनलाईन एडिशनसाठी तयार करण्यात येत असलेल्या व्हीडिओ स्टोरीजची जबाबदारी.

 • २०१० मध्ये सकाळची डिजिटल आवृत्ती ई-सकाळची जबाबदारी. याच खात्यातून २०१३ मध्ये सहयोगी संपादक म्हणून निवृत्त.

 • याशिवाय भटकंतीची आवड. महाराष्ट्र, तत्कालीन आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारमधील अनेक गड-किल्ल्यांची भ्रमंती.

 • सध्या www.policekaka.com या वेबसाईटसाठी सल्लागार संपादक म्हणून काम पाहात आहे.

सतीश दत्ताञय केदारी

सहयोगी संपादक

नाव : सतीश दत्ताञय केदारी
पत्ता : मु. पो. शिरसगाव काटा ता. शिरुर, जि. पुणे.
जन्मतारीख : २३ जुलै १९९१
शिक्षण : डिप्लोमा इन जर्नलिझम, आयटीआय
रक्तगट : B+ positive
मो.नं : 88050 45495
इमेल : kedarisatish546@gmail.com

पुण्यात पञकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर पञकारितेची सुरुवात दैनिक 'लोकमत' मध्ये वार्ताहर म्हणून शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथून केली. ग्रामीण भागातील समस्या, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. त्यानंतर शिरुर तालुक्यातील प्रसिद्ध www.shirurtaluka.com या संकेतस्थळाचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहिले. यात शिरुर तालुक्यातील सामाजिक, राजकीय व समाजाभिमुख प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गुन्हेगारी तसेच ग्रामीण भागातील सामाजिक समस्या यांवर विशेष प्रभुत्व. समाजकार्य व लिखानाची आवड. सध्या www.policekaka.com या संकेतस्थळासाठी सहयोगी संपादक म्हणून काम पाहात आहे.