लिबियात अपहरण झालेल्या ७ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली : लीबियामध्ये अपहरण झालेल्या ७ भारतीयांची सुटका झाली आहे.या सर्व नागरिकांना लवकरच मायदेशी आणण्यात येणार आहे, अशं ट्यूनिशियातले भारताचे राजदूत पुनीत रॉय किंडल यांनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली : लीबियामध्ये अपहरण झालेल्या ७ भारतीयांची सुटका झाली आहे.या सर्व नागरिकांना लवकरच मायदेशी आणण्यात येणार आहे, अशं ट्यूनिशियातले भारताचे राजदूत पुनीत रॉय किंडल यांनी सांगितलं आहे.

14 सप्टेंबरला सात जणांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. ही गोष्ट समोर आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि ट्यूनिशियातील भारतीय दूतावासाने या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते.अपहरणकर्त्यांनी या भारतीय नागरिकांना अल शोला अल मुदिया या तेलकंपनीकडे सोपवल्यानंतर सुटका झालेल्या सर्व भारतीयांशी ट्युनिशियातील भारताचे राजदूत पुनीत रॉय कुंदल यांनी फोनवरून संवाद साधला आहे.

हे सर्वजण सुखरूप असून ब्रेगा येथे कंपनीच्या आवारातच मुक्कामास आहेत. त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी आवश्‍यक असलेल्या औपचारिकता लवकरच पूर्ण केल्या जातील, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.भारतीय नागरिकांच्या सुखरूप सुटकेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आणि प्रामाणिक प्रयत्नांबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने लीबियातील सरकार आणि स्थानिक आदिवासींमधील ज्येष्ठ समन्वयकांचे आभार मानले आहेत.

Title: 7 Indians abducted in Libya released
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे